China Education चिनी शिक्षण

 परदेशी रदेशी शिक्षण घ्यायचं म्हटलं की, आपल्याला युरोप, अमेरिका किंवा जपान हे देश पटकन डोळ्यांसमोर येतात, पण • त्याचबरोबर अनेक वर्ष जगासाठी अलिप्त बनून राहिलेला देश चीन हा विद्याथ्र्यांना विविध प्रकारच्या शिक्षणासाठी खुणावू लागला आहे. ८०-९०च्या दशकात आर्थिक सुधारणांमुळे चीन हा जगाचे उत्पादन केंद्र बनला होता. त्यानंतर तांत्रिक ज्ञान मिळवत


• त्यात अनेक प्रयोग करत चीन आता नवीन महासत्ता म्हणून उदयाला आला आहे. साधारण १९५० पासूनच चीनमध्ये परदेशातील विद्यार्थी शिकण्यासाठी जाऊ लागले. आता परदेशी विद्याथ्र्यांसाठी जागतिक पातळीवरचं शैक्षणिक केंद्र म्हणूनही चीन उदयाला येत आहे. करोनाकाळात विविध विद्यापीठांची आणि त्याबरोबर किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या विविध उद्योगांची तुटलेली साखळी आता नव्यानं बांधली जात आहे.


चीनमध्ये कोणतंही शिक्षण घेताना सर्वात मोठी अडचण ही भाषेची असते. चिनी भाषा हे तेथील सरकार आणि भाषा तज्ज्ञांनी त्या विषयानुसार विकसित केली आहे. म्हणजे एखादा इंजिनीअरिंग करणारा किंवा वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी हा पूर्णपणे चिनी माध्यमातूनच ते विषय शिकतो, त्यामुळे त्यांना इंग्रजी


नावीन्यपूर्ण कोर्सचे पर्याय उपलब्ध करून 7 देणारा चीन हा देश विद्याथ्यांना खुणावत आहे. तेथील विविध अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, करिअरच्या संधी याविषयी माहिती घेऊ या...




शिकण्याची गरज भासत नाही. त्यांच्यामार्फत हे अभ्यासक्रम शिकवले जातात. पूर्वी चीनमध्ये पैजिंग (बीजिंग), शांग हाय (शांघाय), शनचन (शेन झेन), कुआंग चौ (क्वाग झो) या मोठ्या शहरांमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्याचं प्रमाण खूप होतं, मात्र आता अनेक द्वितीय किंवा तृतीयस्तरीय शहरांमध्येसुद्धा शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध आहे.


प्रत्येक विद्यापीठात अत्यंत अद्ययावत परदेशी विद्यार्थी चीनमध्ये येऊन अशा प्रयोगशाळा, लायब्ररीज आणि त्यांनी विविध अभ्यासक्रम शिकावेत, विविध खेळांच्या सुविधाही उपलब्ध यासाठी अनेक चिनी विद्यापीठांनी असतात. या सुविधा कोणत्याही बहुभाषिक म्हणजेच इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्याला सहजरित्या वापरता येतात. शिक्षण देणं सुरू केलं आहे. अशा तापमान नियंत्रित करणाऱ्या पोहण्याच्या विद्यापीठांमध्ये उत्तम इंग्रजी येणारे तलावापासून, मोठमोठी फुटबॉलची चिनी किंवा परदेशी शिक्षक नेमून मैदानं किंवा फेन्सिंगसारखा खेळही प्रशिक्षकांच्या देखरेखी खाली खेळता येऊ शकतो. मी स्वतः चीनमधल्या तीन वेगवेगळ्या गावातील विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे..


सर्व विद्यापीठांमध्ये साधारण सकाळी आठ वाजता वर्ग सुरू होतात. आठ ते बारा आणि दीड ते साडेचार अशा वेळात तुमचे नियमित व इलेक्टिव्ह लेक्चर्स होतात.


तुमच्या मुख्य विषयाबरोबर इतरही अनेक गोष्टी शिकण्याची सोय केलेली असते. जसं चीनी भाषा शिकणाऱ्या मुलांना चीनी कविता, गोष्टी, चित्रपट समजून घेण्यापासून सायमलटेन्यूअस इंटरप्रिटेशनपर्यंत गोष्टी इलेक्टिव्हसमध्ये असतात.

 आणि थोड वेगळ

आर्थिक सुधारणा करत चीनला पूर्णपणे बदलवणारे तंग श्यीआव फिंग यांनी १९७८ साली एक धोरणात्मक निर्णय घेत हुशार चिनी विद्याथ्र्यांना जर्मनी, अमेरिकेत तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. जगातलं सर्वोत्तम ज्ञान त्यांनी मिळवून, परत चीनमध्ये येऊन देशासाठी काम करावं, अशी या मागची भूमिका होती. आता चीनचं नाव हे तांत्रिकदृष्ट्या सर्वात आघाडीवर असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये घेतलं जातं. भारतीय विद्याथ्र्यांनीसुद्धा चिनी प्रगत तंत्रज्ञान शिकून, पुन्हा भारतात येऊन त्याचा उपयोग आणि प्रसार चिनी केला पाहिजे. पुढील लेखात चीनमधील विविध अभ्यासक्रम, विद्यापीठ, शिष्यवृत्तांविषयी माहिती घेऊ या.

Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री मुद्रा योजना स्टार्टअप CGTMSE MSME आणि स्टार्टअपसाठी पाच योजना