भाजीपाला, फळपिकांसाठी कर्ज वाटप शेतकरी कर्ज


शेतकऱ्यांना तीस बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा



■ जिल्ह्यातील खासगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती अशा सुमारे तीस बँकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकयांना पीक कर्ज पुरवठा केला जातो.


■ यासाठी प्रति हेक्टर रक्कम निर्धारित केली जाते. त्याच्या मागणी आणि क्षेत्रानुसार पीक कर्ज वितरित केले जाते.


सन 2023- 2024 या

वर्षांसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये नवीन पीक कर्ज वाटप सुरु झाले आहे . गतवर्षीच्या तुलनेत यंदा उद्दिष्टात वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 85 टक्के इतकी होती.

नाशिक जिल्ह्यासाठी 2022-2023 वर्षांत निर्धारित पीक कर्ज वाटप अधीक करण्यात येणार आहे.त्यापैकी 31 मार्चअखेर खुप मोठया प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात आले.


कोणत्या पिकासाठी किती कर्ज?


अन्य भाजीपाला :

मिरची, टोमॅटो, कांदा, बटाटा, हळद, अद्रक, कोबी आदी पिकांसाठी पन्नास हजारांपासून सुमारे एक लाख पन्नास हजार पर्यंतचे कर्ज वितरित केले जाते.


फळपिकांसाठी :

ॲस्टर, झेंडू गुलाब, जॅस्मीन, मोगरा, निशिगंधा आदी फुलपिकांसाठी 50 हजार ते एक लाखापर्यंतचे कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे.



फूलपिकांसाठी :

द्राक्षे, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, केळी, संत्रा, आंबा, पपई, अंजीर या फळपिकांसाठी दीड ते दोनलाखापर्यंतचे पीक कर्ज दिले जाते.


शेतकऱ्यांना खरीप आणि रबीसाठी बँकांकडून कर्जपुरवठा केला जातो त्यानुसार बँकांना लक्ष्यांकदेखील निर्धारित करून दिला जातो. सरकारी बँका, खासगी बँका, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जाते. मागील वर्षी एकूण पीक कर्ज लक्ष्यांकाच्या 85.32 टक्के इतके कर्ज वितरण करण्यात आले आहे.


जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रबीसाठी पीक कर्जासाठीचे नियोजन करण्यात आले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ करण्यात आली आहे. 

Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री मुद्रा योजना स्टार्टअप CGTMSE MSME आणि स्टार्टअपसाठी पाच योजना