Interesting Facts About Blue Whale Fish महाकाय ब्ल्यू व्हेल




५ कोटी वर्षांपासून समुद्रातील या विशालकाय व्हेल माशाचे अस्तित्व आहे. ११५ फूट लांब आणि १५० ते १७० टन वजनाचा या प्रजातीतील सर्वात मोठा मासा 'ब्ल्यू व्हेल' हा आहे

. हा स्तनधारी मासा असून मानवाप्रमाणेच आपल्या मुलांना दूध पाजून संगोपन करीत असतो. एका वेळी मादी व्हेल एका बाळाला जन्म देते. व्हेल माशाचे दूध पेस्टसारखे घट्ट असते.



यांचे हृदय चार कप्प्यांत विभागलेले असून यात आपण सहज बसू शकतो. ५० ते ६० प्रतितास किमी ते पोहतात. व्हेलच्या अंगावर बारीक केस असतात व रक्तही गरम असते.



 आपल्या इतर साथीदारांना संकेत देण्यासाठी व्हेल अतिशय मधुर आवाज काढतात. याला 'व्हेल साँग' असे म्हटले जाते. या ध्वनिलहरी जवळपास २० हजार वॅट क्षमतेच्या असून दोन किमी अंतरावरूनही ऐकू येतात. या माशाच्या शिकारीवर बंदी आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री मुद्रा योजना स्टार्टअप CGTMSE MSME आणि स्टार्टअपसाठी पाच योजना