क्रिप्टोकरन्सीची बातमी क्रिप्टो करन्सी ची वाढती मागणी.
वॉशिंग्टन येथे झालेल्या काही देशांच्या बैठकीमध्ये | क्रिप्टो संपत्तीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठीच नव्हे तर त्यावर कायमस्वरुपी नियंत्रण ठेवण्यासाठीही जागतिक पातळीवर एकमत घडवून आणण्यावर एकमत झाले आहे.
या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय नातेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शशिकांत दास यांनी जी २० देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गर्व्हनर यांच्या संयुक्त बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.
बैठकीनंतर श्रीमती सितारमण यांनी सांगितले की जी २० देशांनी या बैठकीमध्ये तत्परतेने प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या पुढील जी २० देशाच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या उर्वरित काळात लवकरच क्रिप्टो संपत्तीबाबतच्या वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा आढावा घेणारा तुलनात्मक अहवाल सादर केला जाईल.
त्या पुढे म्हणतात मला हे सांगताना आनंद होत आहे की या मुद्यावरुन आता जी २० देशांमध्ये एकमत झाल्याचे दिसून येत आहे. कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांसाठी कर्जाची फेररचना आणि त्या बाबतचे संतुष्टीकरण हे महत्वाचे मुद्दे आहेत. हे मुद्दे निकालात काढण्यावर या बैठकीत एकमत झाले असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशांना दिलासा देण्याचे प्रयत्न वेगवान करण्याची चर्चा करण्याबाबत एकमत झाले आहे.

Comments
Post a Comment